Ladki Bahin Yojana | योजनेमध्ये बदल पहा संपूर्ण माहिती…

Ladki Bahin Yojana | योजनेमध्ये बदल पहा संपूर्ण माहिती…

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू झालेली लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेली आहे. मध्यप्रदेश या राज्यात चालू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर ती चालू झालेली महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना बनली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात. Ladki Bahin Yojana

केंद्र शासनाच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. 1 जुलैपासून राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू झालेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अमलात आणली गेली. या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना 1500 रुपये देऊन, महिलांच्या सशक्तिकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे असे आपल्याला म्हणता येईल. Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना शिक्षण आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी मदत मिळते, या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना आर्थिक समस्या पासून मुक्तता मिळाली आहे. राज्यातील महिलांचे जीवन अधिक सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून व महिलांना समाजामध्ये सन्मानाने वागणूक मिळावी या हेतून सुरू झालेली लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्या महिला दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. अशा महिलांसाठी ही योजना महत्त्वाची आहे.

आज आपण या लेखांमधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत झालेले बदल, अर्ज कुठे करायचा.? कागदपत्रे कोणती लागणार आहेत.? अर्ज कसा करायचा संपूर्ण प्रक्रिया, लाभार्थी महिला कोण.? या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत, त्यामुळे वाचकानी लेख शेवटपर्यंत वाचावा. Ladki Bahin Yojana

वाचकांना विनंती

लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून ते आत्तापर्यंत या योजनेमध्ये शासनाने अनेक बदल केले आहेत, नवीन फॉर्म भरत असताना आपण संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून अर्ज करणे आवश्यक राहील.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजना आढावा Overwiev

योजनेचे नाव  लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात 1 जुलै 2024
लाभार्थी राज्यातील महिला
उद्देश महिलांना महिन्याला 1500 रुपये देणे
द्वारा सुरू महाराष्ट्र शासन
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्य उद्दिष्टे

● महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या घरी बसलेल्या महिलांना महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत करणे.
● महिला सक्षमीकरण करणे.
● राज्यातील महिलांना महिन्याचे पंधराशे रुपये साठवून एखादा लघु उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने देखील ही योजना सुरू करण्यात आली आहे.
● एकंदरीतच महाराष्ट्र राज्यातील महिलांचा आर्थिक दृष्ट्या विकास व्हावा व आर्थिक मदतीची गरज भासू नये या उद्देशाने मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

1. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एक जुलै 2024 पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले आहे.
2. या योजनेतून दिली जाणारी लाभाची रक्कम ही महिलांच्या थेट बँक खात्यात जमा होते.
3. योजनेची संपूर्ण प्रक्रिये ही ऑनलाईन असल्यामुळे महिलांना घरबसल्या लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरता येतो.
4. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची योजना आहे.
5. लाडक्या बहीण योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन असल्यामुळे महिलांना कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे महिलांचा वेळ व पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होते.

योजनेचा मिळणारा लाभ

● मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये आधार लिंक असलेल्या बँक खात्यात मिळतात. तसेच 3 सिलेंडर गॅस देखील मोफत दिले जातात.

महत्त्वाची अपडेट

● नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की, महिलांना आता थेट 1500 रुपये वरून 2100 रुपये दिले जातील. परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचा जीआर निघालेला नाही.

इतर शासनाच्या योजना

  1. महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या माध्यमातून 51 हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते.
  2. ठिबक सिंचन योजनेचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान+25℅ पूरक अनुदान असे एकूण 80 टक्के अनुदान देण्यात येते

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक पात्रता

● अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
● अर्जदार महिलेचे वय हे 18 ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
● महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
● महिलेच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असता कामा नये.
● महिलेच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर सोडून कोणत्याही प्रकारचे चार चाकी वाहन असता कामा नये.
● अर्जदार महिलाही शासकीय नोकरीत असता कामा नये.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1. महिलेचे आधार कार्ड
2. अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला (या तिन्ही कागदपत्रांपैकी एक असणे अनिवार्य)
3. उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड
4. बँक पासबुक
5. अर्जदाराचे पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
6. हमीपत्र
7. महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अर्ज भरण्याची प्रक्रिया

● अर्जदार महिलेला सर्वप्रथम मोबाईल मध्ये नारीशक्ती दूत हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
● या ॲपच्या माध्यमातून महिला घरबसल्या लाडकी बहिणी योजनेसाठी फॉर्म भरू शकते. Ladki Bahin Yojana

● तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वेबसाईटवरून फॉर्म भरण्यासाठी या https://ladakibahin.maharashtra.gov.in/  दिलेल्या वेबसाईट वरती महिलेला जाऊन फॉर्म भरायचा आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट फॉर्म भरण्यासाठी क्लिक करा
नारीशक्ती हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारी योजनेची माहिती मिळवण्यासाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा

 

सारांश :

अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री Ladki Bahin Yojanaसाठी वरील माहिती वाचून अर्ज भरू शकता, अर्ज भरत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आम्ही नक्की त्याचे उत्तर देऊ माहिती आवडली असल्यास इतर महिलांना देखील शेअर करा. Ladki Bahin Yojana

Leave a Comment