Namo Shetakri Yojana Online Apply 2024 | नमो शेतकरी योजना संपूर्ण माहिती

Namo Shetakri Yojana Online Apply 2024 | नमो शेतकरी योजना संपूर्ण माहिती

Namo Shetakri Yojana Online Apply 2024 : राज्यभरातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये आर्थिक अनुदान देण्यात येते. यामध्ये PM किसान योजनेअंतर्गत देखील सरकार शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देत आहे. म्हणजे नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये व पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये असे वार्षिक 12 हजार रुपये राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांना देत आहे. यामध्ये राज्य सरकारचा 50% वाटा असतो आणि केंद्र सरकारचा 50% असतो. Namo Shetakri Yojana Online Apply 2024

राज्यातील बहुतांशी शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे शेतीसाठी आवश्यक असणारी महत्त्वाची अवजारे, कीटकनाशके, बी- बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पुरेशी पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनेक वेळा आपले दागिने ही घाण ठेवावे लागतात, पैसे नसल्यामुळे अनेका वेळा सावकारी व्याजाने शेतकऱ्यांना पैसे काढावे लागतात. अशाच परिस्थितीमध्ये अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो परिणामी शेतकऱ्यांना शेतामध्ये आलेल्या पिकाला योग्य भाव भेटत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते त्यामुळे राज्य सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक, आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने, राज्यातील शेतकऱ्यांना Namo Shetakri Yojana Online Apply 2024 योजनेअंतर्गत प्रतिवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की, राज्यातील तरुणांनी शेती क्षेत्राकडे वळावे तसेच शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांच्या वाट्याला निराशा येऊ नये. किंवा शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी करत आहे या उद्देशाने ही योजना सुरू झालेली आहे.

Namo Shetakri Yojana Online Apply 2024
Namo Shetakri Yojana Online Apply 2024

महत्वाची सूचना :

नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना आहे. PM किसान योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे.त्यामुळे या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत. नमो शेतकरी योजना या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा करू शकाल.? योजनेसाठी पात्र शेतकरी कोणते आहेत.? या योजनेचा लाभ कोणाला दिला जातो.? कोणकोणती कागदपत्रे लागतात.? अर्ज कुठे करायचा.? याची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे वाचकांनी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. Namo Shetakri Yojana Online Apply 2024

Namo Shetakri Yojana Online Apply 2024 Highlight

योजनेचे नाव नमो शेतकरी योजना
उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
लाभ शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये आर्थिक अनुदान
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन ऑनलाइन

नमो शेतकरी योजनेचे मुख्य उद्दिष्टे

● महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे. Namo Shetakri Yojana Online Apply 2024
● राज्यातील तरुणांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे व शेती क्षेत्राचा झपाट्याने विकास व्हावा हा देखील शासनाचा मुख्य उद्देश आहे.
● राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ, पूर, नैसर्गिक आपत्ती, रोगराई यासारख्या अनेक समस्या उद्भवत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान भरून काढण्याच्या उद्देशाने देखील ही योजना महत्त्वाची आहे.
● महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाडा, विदर्भ यासारखे क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक आत्महत्या होतात, त्या आत्महत्या रोखण्याचा देखील शासनाचा प्रयत्न आहे.
● एकंदरीत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे व शेती क्षेत्राचा विकास झपाट्याने व्हावा, यासाठी शेतकऱ्याने प्रयत्न करावा हे देखील शासनाचे मुख्य उद्देश आहे.

सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

नमो शेतकरी योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

1. नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली एक महत्त्वपूर्ण योजना असून राज्य शासनाच्या कृषी विभागातून ही योजना चालवली जाते.
2. या योजनेचा लाभ एक कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार असून ज्याच्यासाठी राज्य सरकार 6 हजार 900 कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले गेले आहे.
3. नमो शेतकरी योजना व PM किसान योजना या दोन्ही योजना जरी वेगवेगळ्या असल्या तरी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून एकत्रिकरणाने सुरू करण्यात आलेल्या या योजना आहेत.
4. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून मिळणारी रक्कम ही डीबीटी च्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होते.
5. नमो शेतकरी योजनेचा लाभ हा राज्यातील सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांना दिला जातो.
6. नमो शेतकरी योजना ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांना असल्यामुळे राज्यातील एक महत्त्वाची योजना आहे.

नमो शेतकरी योजनेच्या नियम व अटी

● नमो शेतकरी योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांनाच दिला जातो.
● महाराष्ट्र राज्य बाहेरील असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
● नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावरती जमीन असणे आवश्यक आहे.
● शासकीय व निमशासकीय सेवेत असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
● नमो शेतकरी योजनेचा अर्ज हा ऑनलाईन व ऑफलाईन करणे आवश्यक राहील. Namo Shetakri Yojana Online Apply 2024

नमो योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होणारा आर्थिक फायदा

● नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 6 हजार रुपये आर्थिक स्वरूपाचे लाभ दिला जातो. व PM किसान योजनेअंतर्गत 6 हजार रुपये आर्थिक लाभ दिला जातो, असे दोन्ही मिळून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून 12 हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.
● नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जातील, राज्यातील तरुण हे शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील व शेती क्षेत्राचा झपाट्याने विकास होण्यास मदत होईल.
● शेतकऱ्यांना बी बियाणे तसेच अवजारे घेण्यासाठी या योजनेचा नक्की फायदा होईल.

शासनाच्या इतर योजना पहा. 

  1. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मागील त्याला शेततळे ही योजना सुरू केलेली आहे. संपूर्ण माहीती पाहण्यासाठी क्लिक करा 
  2. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही 1 मे 2016 पासून देशभरातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. पहा संपूर्ण योजना 

 

नमो शेतकरी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

1. आधार कार्ड
2. रेशनकार्ड
3. रहिवाशी प्रमाणपत्र
4. उत्पनाचे प्रमाणपत्र
5. 7/12 उतारा
6. मोबाईल नंबर
7. ई मेल आयडी
8. पासपोर्ट आकाराचे फोटो
9. इत्यादी

Namo Shetakri Yojana Online Apply 2024 योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

नमो शेतकरी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो, व ऑनलाईन प्रक्रिया झाल्यानंतर जवळच्या कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन संपूर्ण कागदपत्रे जमा करून अर्ज करावा लागतो.

● अर्जदार शेतकऱ्याला सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
● आता तुमच्यासमोर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा अर्ज ओपन होईल.
● अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून जसे की,(अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड, बँक खात्यांचा तपशील इत्यादी) सर्व माहिती भरून व आवश्यक कागदपत्रे ती अपलोड करावी लागतील.
● सर्व माहिती भरल्यानंतर Save या बटनावरती क्लिक करावे लागेल.
● अशाप्रकारे अर्जदार शेतकऱ्याचा नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरला जाईल.
● ऑनलाइन अर्ज Submite झाल्यानंतर काही दिवसांमध्ये संपूर्ण माहिती तुमची कृषी अधिकाऱ्याकडे जाईल.
● कृषी अधिकाऱ्यांकडून तुमचे अर्जाची पडताळणी होईल व आवश्यक असल्यास कागदपत्रे घेतली जातील.
● अशाप्रकारे तुमच्या अर्जाची संपूर्ण पडताळणी होईल, व तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ भेटेल.

नमो शेतकरी सन्मान योजना अधिकृत वेबसाईट क्लिक करा
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप  जॉईन करा

 

सारांश :

अशाप्रकारे तुम्ही Namo Shetakri Yojana Online Apply 2024योजनेसाठी संपूर्ण माहिती वाचून ऑनलाइन अर्ज भरू शकता. तुम्हाला अर्ज भरत असताना कोणत्याही अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचे उत्तर देऊ. माहिती आवडली असल्यास तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना देखील ही माहिती आवर्जून शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment