E-Peek Pahani Information 2024 | ई पीक पाहणी कशी करावी पहा संपूर्ण माहिती..

E-Peek Pahani Information 2024 | ई पीक पाहणी कशी करावी पहा संपूर्ण माहिती..

E-Peek Pahani Information 2024 : भारत हा कृषिप्रधान देश आहे, कृषीप्रधान देशांमध्ये सर्वाधिक शेती क्षेत्र व्यापले आहे, त्यामुळे देशातील सर्वात जास्त लोकसंख्या ही शेती वरती अवलंबून आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर कृषी क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर क्रांती होत आहे, तसेच शेतीची साठवली जाणारी माहिती देखील आता ऑनलाईन झालेली आहे, जसे की, सातबारा उतारा (7/12) 8 अ, फेरफार हे सर्व डिजिटल स्वरूपात झाले असल्यामुळे आता शेतामध्ये कोणते पीक आहे हे देखील शेतकऱ्यांना ऑनलाइनच नोंदवावे लागणार आहे. थोडक्यात काय तर शेतामध्ये येणारे खरीप व रब्बी किंवा नगदी स्वरूपाचे जे पीक असेल ते आपल्या मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोबाईल द्वारे नोंदवावे लागणार आहे.

शेतकऱ्यांना पूर्वी शेतामधील पिकांची नोंद हे तलाठी घेत होते, परंतु अलीकडच्या काळामध्ये सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये जाऊन स्वतःच्या पिकाची 7/12 वरती नोंद करणे गरजेचे झाले आहे. हे करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, यामध्ये बरेचशे शेतकरी हे असूशिक्षित असल्यामुळे त्यांना ऑनलाईन पिकाची नोंद करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन पिकाची नोंद करता येऊ यासाठी ॲप डेव्हलप केले असून ते हाताळण्यासाठी अतिशय सोपे आहे परंतु तरीदेखील ग्रामीण भागामध्ये नेटवर्क प्रॉब्लेम किंवा अन्य समस्यांचा सामना करावा लागतो. E-Peek Pahani Information 2024

शेतकरी वर्ग हा सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये आढळून येतो त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आता एक पीक पाहणी नोंदवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पीक पाहणी बद्दल संपूर्ण माहिती नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांना ही पीक पाहणी बद्दल माहिती आहे असे शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे आज आपण या लेखांमधून E-Peek Pahani Information 2024 म्हणजे काय ही पीक पाहणी मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे वाचकांनी लेख हा शेवटपर्यंत वाचावा.

शेतकरी बांधवांना E-Peek Pahani Information 2024करण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र किंवा अन्य कोणत्याही सायबर कॅफेमध्ये जाऊन नोंद करण्याची आवश्यकता नाही. आता पीक पाहण्यासाठी शेतकरी स्वतःच्या शेतावरती जाऊन स्वतः मोबाईलच्या माध्यमातून इ पीक पाहणी करू शकतो तेही अगदी फ्री मध्ये, शेतकऱ्यांना शेतामध्ये जाऊन स्वतः पीक पाणी करता यावी यासाठी शासनाचे ॲप देखील आहे. आणि ॲपच्या माध्यमातून शेतकरी थेट आपल्या बांधावरून E-Peek Pahani Information 2024अगदी काही वेळातच घर बसल्या करू शकतो.

E-Peek Pahani Information 2024
E-Peek Pahani Information 2024

E-Peek Pahani Information 2024 चे मुख्य उद्दिष्टे

● राज्यातील शेतकऱ्यांची ई पीक पाहणी जलद गतीने व्हावी तसेच एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांना जलद गतीने नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने ई पीक पाहणी सुरू केले आहे.
● शासनाला ईपीक पाहणी केल्यामुळे संपूर्ण आलेले पीक किती क्षेत्रांमध्ये व्यापलेले आहे हे कळण्यास मदत होते.
● राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई जलद गतीने उपलब्ध करून देऊन, शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना देखील शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे हे देखील शासनाचे उद्दिष्ट आहे.
● पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग करून घेणे.
● शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे व शेती क्षेत्राचे संपूर्ण माहिती ही ऑनलाइन प्रक्रियेत घेणे.
● पिक विमा आणि पीक पाहणी हे दावे निकाली काढण्यासाठी प्रक्रिया सुलभ करणे.
● राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये रब्बी, खरीप या हंगामामध्ये कोणते पीक आहे ते प्रत्यक्षात काळजीपूर्वक सातबारा उताऱ्यावरती नोंद करता यावी व शेतकऱ्यांना शासनाचे दिले जाणारे लाभ अचूक मिळतील या उद्देशाने पीक पाहणी सुरू करण्यात आले आहे.

ई पीक पाहणी चे मुख्य वैशिष्ट्ये

1. महाराष्ट्र शासनाचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलच्या साह्याने स्वतःच्या शेतामध्ये जाऊन स्वतः पीक नोंद करावी, यासाठी सुरू करण्यात आलेला एक महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम आहे.
2. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने सदर कार्यक्रम राबवणे महत्वपूर्ण आहे.
3. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व कृषी विभागाचे एकत्रीकरणाने हा कार्यक्रम राबवला जात आहे.
4. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये जाऊन आपल्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद करता येणार आहे.
5. आपल्या पिकाची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयात जायची शेतकऱ्यांना गरज नाही. त्यामुळे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची शेतकऱ्यांची बचत होणार आहे.
6. सदरची नोंदणी प्रक्रिया मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन प्रकारे करण्यात येत आहे, त्यामुळे शेतकरी घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने पिकांची नोंद करू शकतात.
7. टाटा ट्रस्ट द्वारे ह्या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.
8. शेतकऱ्यांना वापरण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने हे ॲप डेव्हलप केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सहज आपल्या पिकाचे नोंद करता येणे शक्य आहे.
9. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात हा नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
10. आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये 10 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी या ॲप माध्यमातून आपल्या पिकाची नोंदणी केली आहे.

सरकारी योजनेसाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.

E-Peek Pahani Information 2024 नोंदणी करण्याचा कालावधी

● सर्वसाधारणपणे प्रत्येक हंगामामध्ये सुरुवातीची दोन महिने शेतकरी आपल्या शेतातील पिकाची पीक पाहणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून करू शकतो, त्यानंतरचा एक महिना तलाठी व कृषी सहाय्यक हे पडताळणी करतील आणि त्यानंतर तलाठी अज्ञावली द्वारे पीक पाहणीला अंतिम मान्यता देतील. E-Peek Pahani Information 2024

ई पीक पाहणी योजनेचा फायदा

● महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी मोबाईलच्या माध्यमातून ई पीक पाहणी केल्यास, शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून दिले जाणारे लाभ सहजतेने देता येतील, तसेच एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यानंतर त्या शेतीचा पंचनामा करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी त्याचा फायदा होईल.

● तलाठ्यांच्या कामाचा बोजा कमी होईल, तसेच इतर कामे करण्यासाठी तलाठ्यांना सुलभ होईल.

● पिक विमा देण्यासाठी शासनाला ही माहिती फायदेशीर ठरेल.

● कृषी गणना अत्यंत सुलभ पद्धतीने व अचूक रित्या महाराष्ट्र शासनाला पूर्ण करता येईल.

● राज्यातील शेतकरी हे आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जातील.

● शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकाची नोंद स्वतः केल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टींची बचत होते.

शासनाच्या इतर योजना पहा 

1.अनुसूचित जाती-जमाती मधील जे नागरिक आहेत किंवा ते आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत, ज्यांना राहायला स्वतःचे घर उपलब्ध नाही. अशा कुटुंबांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत स्वतःचे 269 चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घरकुल बांधण्यासाठी 2 लाखापर्यंत आर्थिक अनुदान दिले जाते,  शबरी घरकुल योजना 2024 
2. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ट्रॅक्टर अनुदान योजना राबवली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी 8HP ते 70HP पर्यंत ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान म्हणजेच 1 लाख 25 हजार रुपये अनुदान दिले जाते.
3. राज्यातील विधवा महिलांसाठी राबवली जाणारी महत्वपूर्ण योजना म्हणजे इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024-25

 

E-Peek Pahani Information 2024

ही पिक पाहणी कार्यक्रमाचे नियम व अटी

● केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच या प्रकल्पात सहभागी होऊ शकतात व पिकांची नोंद करू शकतात.
● राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या प्रकल्पात सहभागी होता येणार नाही किंवा राज्याच्या बाहेरील शेती असल्यास या ॲपच्या माध्यमातून नोंदणी करता येणार नाही.
● फक्त या ॲपच्या माध्यमातून पिकांचीच नोंदणी करता येते.

शेतकऱ्यांसाठी स्वतः नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

● पिकांची नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना स्वतःकडे स्मार्ट मोबाइल असणे आवश्यक आहे.
● स्मार्ट मोबाइलच्या माध्यमातून प्ले स्टोर वरून ईपीक पाहणी चे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे.
● एका मोबाईलच्या माध्यमातून किंवा एका नंबर वरून एकूण वीस खातेदारकांची नोंदणी करता येऊ शकते.

ई पीक पाहणी करण्याचे संपूर्ण प्रक्रिया

● आता सर्वप्रथम शेतकऱ्याला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून प्ले स्टोर वर जाऊन ईपीक पाहणी हे ॲप [E-Peek Pahani Information 2024] डाऊनलोड करायचे आहे.

E-Peek Pahani Information 2024
E-Peek Pahani Information 2024

● हे ॲप्लिकेशन डाऊनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करायचे आहे आणि तुमच्या महसूल विभागाची निवड करायची आहे.

● आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.

● मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग जिल्हा तालुका गाव याची निवड करायची आहे व पुढे हे ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.

● आता पुढे तुम्हाला तुमचे पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक यापैकी एखादी माहिती भरून शोधा या बटणावरती क्लिक करायचे आहे.

● आता तुम्हाला खातेदाराची निवड करायची आहे,

● आता तुम्हाला तुमची खाते निवडून पुढे जायचे आहे पुढे जाऊन तुम्हाला पीक पेरणीची माहिती भरायचे आहे.

● आता तुम्हाला पिकाची निवड करायची आहे, पिकाची निवड केल्यानंतर तुम्हाला सिंचन साधन आणि प्रकार निवडायचा आहे.

● आता तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन पिकांचे फोटो अपलोड करायचे आहेत, त्यामध्ये तुम्हाला पिकांचे अक्षांश-रेखांश सहित उभे पिकाचे छायाचित्र अपलोड करायचे आहे.

● अशाप्रकारे तुम्ही तुमच्या ॲपच्या माध्यमातून तुमच्या शेतातील पिकाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकाल.

पीक पाहणी ॲप डाऊनलोड करा
शासकीय माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

सारांश :

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन स्वतःच्या पिकाचे नोंद तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सातबारा उताऱ्या वरती नोंदवू शकता. तुम्हाला काही अडचणी येत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा नक्की त्याचे उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू, माहिती आवडली असल्यास इतरांना देखील सांगा व इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करायला विसरू नका. E-Peek Pahani Information 2024

Leave a Comment