सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024 : पात्रता, आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024 : पात्रता, आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024 : महाराष्ट्र राज्यातील अनेक कुटुंब हे दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात, अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पुरेशे आर्थिक पाठबळ नसल्यामुळे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडावे लागते. अनेक विद्यार्थ्यांचे शिकण्याची इच्छा असून देखील घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, त्यामुळे त्या कुटुंबाचा आर्थिक सामाजिक विकास होत नाही. आजही ग्रामीण भागामध्ये मुलांच्या शिक्षणापेक्षा मुलींच्या शिक्षणाला कमी महत्त्व दिले जाते. मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. मुलींना शिक्षण घेण्यासाठी शहरी ठिकाणी पाठवले जात नाही किंवा शिक्षणासाठी लागणारे आर्थिक सहाय्य पुरवले जात नाही त्यामुळे अनेक मुली या शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

महाराष्ट्र राज्यातील काही कुटुंब ही आपल्या मुलांचे शिक्षणासाठी मोठ्या व्याजदराने इतरांकडून पैसे घेतात व पैसे फेडू न शिकल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो, परिणामी मुलांना अर्धवट शिक्षण सोडावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024 सुरू केलेली आहे.

महाराष्ट्र राज्यातील गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देऊन, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारा व त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी इतर विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत टिकून राहता यावे अशा या गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना अमलात आणली आहे. आजही ग्रामीण भागामध्ये अनेक कुटुंब स्थलांतर पद्धतीने जीवन जगतात, एका ठिकाणी राहून त्यांना व्यवसाय करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आर्थिक पाठबळ पुरवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना खूप महत्त्वाची ठरलेले आहे. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024 Highlight

योजनेचे नाव  सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना
लाभार्थी राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थी
मिळणारा लाभ 6 हजार रुपये ते 18 हजार रुपये
उद्देश शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन

 

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेचे मुख्य उद्दिष्टे

● सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक साहाय्य पुरवले जाते.
● या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून राज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार आहेत. तसेच उच्च शिक्षण घेऊन या विद्यार्थ्यांचे सामाजिक व आर्थिक प्रश्न सुटणार आहेत.
● जे कुटुंब आपल्या मुलांवरती शैक्षणिक खर्च करू शकत नाहीत, अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
● महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 6 हजार रुपये ते 18 हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकेल.
● सर्वसाधारणपणे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती चा विचार करता महाराष्ट्र राज्यातील जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे जीवन जगत आहेत, त्यांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता यावे तसेच उच्च शिक्षण घेऊन त्यांनी स्वतःच्या पायावरती उभे राहावे यासाठी ही स्कॉलरशिप योजना अमलात आणली आहे.
● सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलांना आत्मनिर्भर व सक्षम करणे.
● राज्यातील मुलांना शिक्षणासाठी स्वतःच्या पायावरती उभे करणे. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

1. महाराष्ट्र शासनाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या शैक्षणिक विभागातून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
2. महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे.
3. सदर योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन केली गेली आहे. त्यामुळे अर्जदार विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारच्या शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होईल.
4. महाराष्ट्र राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यासाठी पुणे विद्यापीठाने व महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थशाही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पदवी व पदवीधर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आर्थिक मागास असलेल्या कुटुंबांना व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.
5. शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही, किंवा ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून विद्यापीठाकडून सदर अर्थसहाय्य योजना कार्यान्वित केली आहे. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना नियम व अटी

● महाविद्यालयातील व विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेले जास्तीत जास्त 10 व अवसायिक पदवी तर अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024 अर्थसहाय योजनेसाठी पात्र राहतील.
● पात्र विद्यार्थ्यांसाठी पदवी व पदवीधर अभ्यासक्रमासाठी 3000 रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येईल.
● विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.( यासाठी तहसील उत्पन्न दाखला आवश्यक राहील)
● विद्यार्थ्यांना या योजनेच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारे पगारी नोकरी स्वीकारता येणार नाही.
● सदर दिले जाणारे अर्थशाही पात्र विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रमात फक्त एकदाच देण्यात येईल.
● शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना सदरील योजना लागू राहणार नाही याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी आणि प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे गरजेचे राहील.

शासनाच्या इतर योजना पहा 

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना, महराष्ट्रातील तरुणांना १० लाखपर्यंत व्यवसायासाठी कर्ज मिळनार  

Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 योजनेची संपूर्ण माहित्ती पहा 

 

पदवी अभ्यासक्र

विभाग शिष्यवृत्ती विद्यार्थी संख्या
कला रक्कम 6 हजार रुपये 470
वाणिज्य रक्कम 6 हजार रुपये 470
विज्ञान 10 हजार रुपये 470

 

पदव्युत्तर अभ्यासक्रम

विभाग शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची संख्या
कला रक्कम 8 हजार रुपये 300
वाणिज्य रक्कम 8 हजार रुपये 300
विज्ञान 16 हजार रुपये 300

 

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1. आधार कार्ड
2. कुटुंबाचे रेशन कार्ड
3. रहिवासी प्रमाणपत्र
4. मार्कलिस्ट
5. बँक पासबुक
6. मोबाईल नंबर
7. ईमेल आयडी
8. उत्पन्नाचा दाखला
9. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
10. प्राचार्य शिफारस प्रमाणपत्र आवश्यक

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मोबाईलच्या साह्याने देखील अर्ज करता येऊ शकतो.

● अर्जदार विद्यार्थ्याला सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
● होम पेजवर आल्यावर New User वर क्लिक करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा.
● आता पुढे User Name आणि Password टाकून लॉगिन करावे.
● आता पुढे तुमच्या समोर नवीन एक पेज ओपन होईल, त्यामध्ये Apply For scholarship या बटणावर क्लिक करावे लागेल.
● आता पुढे तुमच्यासमोर नवीन एक पेज ओपन होईल, त्यामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत संपूर्ण माहिती तपासून सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024

● अशाप्रकारे तुमचा सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज भरला जाईल.

शासनाचे अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
सरकारी योजनेसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

सारांश –

अशाप्रकारे तुम्ही सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024 योजनेसाठी वरील माहिती सर्व वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता, सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना एक महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे त्यामुळे या योजनेची माहिती इतर विद्यार्थ्यांना देखील देऊ शकता जेणेकरून इतरांचा देखील शिक्षणासाठी फायदा होईल. माहिती आवडली असल्यास इतरांना देखील शेअर करायला विसरू नका. तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुरू कळवा त्याचे नक्की उत्तर दिले जाईल.

Leave a Comment