Bandhkam Kamgar Yojana 2024 | लाभार्थी कागदपत्रे अर्ज सर्व माहिती

Bandhkam Kamgar Yojana 2024 | लाभार्थी कागदपत्रे अर्ज सर्व माहिती

Bandhkam Kamgar Yojana 2024 : महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे राज्यांमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार तसेच त्या कामगारांचे कुटुंब यांचे सामाजिक व आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना आहे.

केंद्र शासनाच्या अंतर्गत व राज्य शासनाच्या अंतर्गत नेहमी सर्वसामान्य जनतेसाठी लोककल्याणकारी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचा सामाजिक, आर्थिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून या महत्वपूर्ण योजना चालवल्या जात असतात. महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा, कामगारांच्या मुलांना शैक्षणिक आर्थिक सहाय्यक उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या आरोग्य विषयी आर्थिक मदत करणे, यासाठी ही योजना महाराष्ट्रभर राबवली गेली आहे. योजनेच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना विविध योजनेचा लाभ देखील दिला जातो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना विविध प्रकारची मदत देखील केली जाते. Bandhkam Kamgar Yojana 2024

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे, त्यांचे जीवनमान सुधारणे, बांधकाम क्षेत्रामध्ये अनेक धोकादायक ठिकाणी असतात तेथे बालकामकरांना काम न करू देणे, तसेच राज्यामध्ये रोजगार क्षमता वाढवणे, रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी शाश्वत आधारवर कौशल्य विकास करणे, तसेच कामगारांच्या सुरक्षेसाठी धोरणे, कार्यक्रम, योजना प्रकल्प घालून आणि कामगारांचे जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणणे, या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बांधकाम कामगार योजना सुरू करण्यात आलेली आहे. Bandhkam Kamgar Yojana 2024

महाराष्ट्र राज्यातील Bandhkam Kamgar Yojana 2024 कामगार हे बहुदा असुरक्षित आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असतात, या कामगारांना अत्यंत कमी वेतन तसेच अनेक सामाजिक लाभापर्यंत हे पोचू शकत नाहीत. या सर्व समस्या या कामगारांच्या असल्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे फायदेशीर आहे. ज्या कामगारांना बांधकाम कामगार योजना चा लाभ घ्यायचा असेल त्या कामगारांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज कराययाचा आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. लाभार्थी कोण असू शकणार आहेत. योजनेसाठी पात्रता काय आहे. अर्ज कसा करायचा, या सर्व बाबींची माहिती या लेखामध्ये दिली आहे हा लेख शेवटपर्यंत वाचावा. Bandhkam Kamgar Yojana 2024

Bandhkam Kamgar Yojana 2024
Bandhkam Kamgar Yojana 2024

Bandhkam Kamgar Yojana 2024 Highlight

योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना
राज्य महाराष्ट्र
विभाग बांधकाम कामगार विभाग
द्वारा सुरू  महाराष्ट्र सरकार
लाभार्थी राज्यातील बांधकाम कामगार
अर्ज करण्याची पद्धत   ऑनलाईन

 

बांधकाम कामगार योजनेचे मुख्य उद्दिष्टे

● महाराष्ट्र राज्यामध्ये जे बांधकाम कामगार आहेत या बांधकाम कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक आर्थिक तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये आर्थिक मदत करणे, त्यांचे जीवनमान सुधारणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

● नवीन बांधकाम कामगार यांना विविध योजनेची माहिती पोहोचवून त्या योजनांचा लाभ देणे.

● महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार यांचे जीवनमान सुधारणे.

● बांधकाम कामगारांच्या मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे, तसेच त्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहेत.

● Bandhkam Kamgar Yojana 2024 बांधकाम कामगार या घटकांमध्ये काम करणारे कामगारांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.

● महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींचे भविष्य उज्वल करणे, व त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे देखील या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे.

बांधकाम कामगार योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

1. बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
2. बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना देऊन त्यांचे आयुष्य सुखकर करणे या योजनेचे वैशिष्ट्ये आहे.
3. बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून कामगारांना व त्यांच्या कुटुंबांना विविध प्रकारचे लाभ दिले जातात.
4. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिली जाणारी लाभाची आर्थिक रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या साह्याने थेट जमा करण्यात येते.
5. बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करण्याची अत्यंत सोपी पद्धत ठेवण्यात आली आहे. अर्जदार हा घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने अर्ज सादर करू शकतो, तसेच अर्जदाराला कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याचे आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे अर्जदाराचा पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टींची बचत होते.
6. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असल्यामुळे लाभ मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अर्जाची सर्व स्थिती अर्जदार मोबाईलच्या साह्याने वेळोवेळी जाणून घेऊ शकतो.

सरकारी योजनेसाठी व्हाट्सअप ग्रुप join kara

बांधकाम कामगार योजनेतून दिले जाणारे महत्वाचे लाभ

● सामाजिक सुरक्षा
1. नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या विवाहाच्या खर्चासाठी व प्रतिपृतीसाठी 30 हजार अनुदान दिले जाते. यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असेल.
2. तसेच नोंदणीकृत लाभार्थी कामगारास मोफत मध्यान भोजन सुविधाही दिली जाते.
3. Bandhkam Kamgar Yojana 2024 कामगारासाठी उपयुक्त आवश्यक असलेल्या अवजारे खरेदी करण्यासाठी प्रती कुटुंबास 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
4. नोंदणीकृत लाभार्थी कामगारास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विविध योजनेचे लाभ दिले जातात.
5. दिनांक 31 ऑगस्ट 2014 रोजी नोंदणी जीवित असलेल्या सदर नोंदणी बांधकाम कामगाराला दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी प्रति कामगार 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल.

● शैक्षणिक सहाय्य

1. Bandhkam Kamgar Yojana 2024 नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना इयत्ता पहिली सातवी मध्ये किमान 75 टक्के अधिक गुण असल्यास 2500 रुपये प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य दिले जाते.
2. नोंदणीकृत कामगारांच्या दोन पाल्यांना दहावी व बारावी मध्ये किमान 50 टक्के गुण असल्यास 10 हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य दिले जाते.
3. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी 20 हजार रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते.
4. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रती शैक्षणिक वर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता 1 लाख रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता 60 हजार रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते.
5. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना शासनमान्य पदविकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रती शैक्षणिक वर्षी 20 हजार रुपये आणि पदव्युतर पदवीका मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रती शैक्षणिक वर्षी 25 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
6. संगणकाचे शिक्षण MS-CIT घेत असलेल्या नोंदणीकृत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना, शुल्काची परीपुर्ती, तथापि MS-CIT उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपुर्तीसाठी करण्यात येते.

● आर्थिक सहाय्य

1. नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
2. नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगारास अटल बांधकाम कामगार आवास शहरी अर्थसहाय्य्य योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते.
3. घर बांधणी साठी 4.5 लाख रुपये अर्थसहाय्य, केंद्र शासन 2 लाख रुपये व कल्याणकारी मंडळ 2.5 लाख रुपये दिले जाईल.
4. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास 10 हजार रुपये त्याच्या अंत्यविधीसाठी मदत स्वरूपात दिली जाते.
5. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस फक्त 2 वर्षांपर्यंत प्रतिवर्षी 24 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
6. घरखरेदी किंवा घरबांधणीकरिता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम 6 लाख किंवा 2 लाख अनुदान स्वरूपात दिली जाईल.
7. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांकरीता व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत उपचाराकरीता नोंदीत बांधकाम कामगारास 6 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जातील. Bandhkam Kamgar Yojana 2024

शासनाच्या इतर योजना पहा 

  1. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना निवासी, निर्वाह तसेच भोजनासाठी भत्ता देऊन त्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते  Dindayal Upadhyay Yojana 2024
  2. आंतरजातीय विवाह योजना 2024  या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील आंतरजातीय विवाह केल्यास राज्य शासनाकडून 50 हजार रुपये व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून 2.50लाख रुपये अशी दोन्ही मिळून 3 लाख रुपये पर्यंतचे विवाहित जोडप्यास अनुदान दिले जाते.

बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Documents 

1. सक्षम प्राधिकार्‍याने नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत.
2. आधार कार्ड ची प्रत
3. सातबारा उतारा 7/12
4. पासबुक झेरॉक्स

बांधकाम कामगार योजनेचे नियम व अटी

● 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
● महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
● कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न1 लाखाच्या आत असणे आवश्यक राहील.
● या योजनेच्या माध्यमातून सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांना व पहिल्या दोन मुलांसाठीच लागू आहे. Bandhkam Kamgar Yojana 2024
● बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.

बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

सदरील योजनेसाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम शासनाचे या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे लागेल.

● पुढे होमपेज वर गेल्यावर बांधकाम कामगार नोंदणी या पर्यावरणातील क्लिक करावे लागेल.

● आता नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.

● अशाप्रकारे सर्व माहिती भरून तुम्ही पुढील सर्व प्रोसेस पूर्ण करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज भरू शकता.

● फॉर्म भरत असताना तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन व्यवस्थितपणे फॉर्म भरू शकता. Bandhkam Kamgar Yojana 2024

शासनाचे अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा येथे क्लिक करा
सरकारी योजनेसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

सारांश –

अशाप्रकारे तुम्ही Bandhkam Kamgar Yojana 2024  योजनेसाठी वरील प्रमाणे सर्व माहिती वाचून या योजनेचा लाभ मिळू शकतात. तसेच तुम्हाला काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही नक्की उत्तर देऊ.

Leave a Comment