प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 : फक्त 330 रुपयात दोन लाखाचा विमा

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 : फक्त 330 रुपयात दोन लाखाचा विमा

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 : भारताची लोकसंख्या ही जगाच्या तुलनेमध्ये खूप प्रमाणात वाढत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या देशामध्ये बहुतांश लोक हे दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. अनेकांची आपली आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे प्रत्येकाला विमा काढणे व त्याचा प्रीमियम भरणे शक्य नाही. हीच गोष्ट केंद्र सरकारने लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मे 2015 रोजी देशातील प्रत्येक गरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेची सुरुवात केली गेली.

देशामध्ये गरिबी फार मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येकाला स्वतःचा संरक्षण विमा काढणे शक्य नाही व काढलेल्या विमाचा प्रीमियम भरणे सर्वांना शक्य नाही. अनेक कुटुंबामध्ये उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपल्या संरक्षण विमा काढता यावा व त्याचा कमीत कमी प्रीमियम भरून या विम्याचा लाभ घेता यावा यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, घरातील मृत व्यक्ती ही जर कमवणारी असेल तर इतर व्यक्तींचे जगणे मुश्किल होऊन जाते. याच गोष्टीचा विचार करून भारत सरकारने देशातील लोकांच्या भविष्याचा विचार करून प्रत्येकाला परवडेल अशी एक विमा योजनेची सुरुवात केली आहे. ज्याचा लाभ हा देशातील कोणतेही व्यक्ती घेऊ शकतो. कुटुंबातील व्यक्ती जर वृत्तपावली तर या संरक्षण मिळण्यातून दोन लाख रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते.

या योजनेअंतर्गत लाभार्थी सरकारी किंवा खाजगी कंपनीच्या माध्यमातून स्वतःचा विमा उतरवू शकतो, या योजनेत सहभागी झालेल्या 18 ते 55 वर्षाच्या व्यक्तीचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीला व त्याच्या वारसांना दोन लाख रुपये दिले जातात. या योजनेचा विमा उतरवण्यासाठी फक्त अर्जदार व्यक्तीला वार्षिक 330 रुपये प्रीमियम भरावा लागतो.

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 Highlight

योजनेचे नाव प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024
योजनेची सुरुवात  2015 पासून
लाभार्थी  देशातील नागरिक
योजनेचा उद्देश  देशातील सर्वसामान्य नागरिकांना विमा संरक्षण देणे
अर्ज करण्याची प्रक्रिया  ऑनलाईन

 

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 मुख्य उद्देश

● भारत देशातील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या किंवा सर्वसामान्य व्यक्तींना विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

● कुटुंबातील एखाद्या कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास इतर कुटुंबातील सदस्या वरती उपासमारीची वेळ येऊ नये या उद्देशाने प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना सुरू करण्यात आली आहे.

● या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबांना दोन लाखाचे विमा संरक्षण दिले जाते.

● जेणेकरून कुटुंबातील एखादी व्यक्ति मृत पावल्यानंतर इतर सदस्या वरती उपासमारीची वेळ येऊ नये.

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 मुख्य वैशिष्ट्ये

1. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे.
2. या योजनेच्या माध्यमातून वयाच्या 55 वर्षापर्यंत व्यक्तीला विमा संरक्षण दिले जाते.
3. सदरी योजनेची प्रक्रिया ही ऑनलाईन असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याच्या आवश्यकता नाही.
4. 18 ते 55 वर्ष वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो.
5. या योजनेसाठी वार्षिक 330 रुपये प्रीमियम भरून दोन लाखापर्यंत विमा उतरवला जातो.
6. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना कोणत्याही शारीरिक तपासण्याची देखील आवश्यकता लागत नाही.

शासनाच्या इतर योजना पहा 

1. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना या शेतकर्यांना दिला जातो लाभ 
2. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकर्यांना मोफत कृषी पंप वाटप योजना पहा क्लिक करून सविस्तर 

 

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ

● अर्जदाराला वार्षिक केवळ 330/- रुपये भरून 2 लाखांचा संरक्षण विमा घेता येतो.

● या योजनेअंतर्गत अर्जदार विमाधारकाचा आकस्मितपणे मृत्यू झाल्यास त्या मृत व्यक्तीच्या वारसदारांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

● प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 या योजनेचा कालावधी 1 जून पासून सुरू होतो व 31 मे पर्यंत ग्राह्य धरला जातो.

● योजनेचा लाभ सतत सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावे लागते.

● या योजनेत सहभागी झाल्यापासून 45 दिवसांपर्यंत विमाधारकाला दावा करता येत नाही.

● विमा संरक्षण मिळवण्यासाठी व्यक्ति मृत झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत मध्ये दावा करणे आवश्यक राहील.

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेच्या नियम व अटी

● सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार नागरिकास प्रतिवर्षी 330/- रुपये प्रीमियम भरावा लागतो.
● प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय हे 18 ते 55 वर्ष असणे बंधनकारक आहे.
● अर्जदार लाभार्थ्याचे बँक असणे आवश्यक आहे.
● लाभार्थी व्यक्तीला आपल्या बँक खात्यात ऑटो डेबिट ऑप्शन एनेबल करणे आवश्यक आहे. जेणेकरून विमेच्या हप्त्याचे रक्कम ऑटोमॅटिक बँक खात्यातून वजा केली जाईल.
● सदरील संरक्षण विमा हा फक्त 55 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या विमा चा लाभ घेता येणार नाही.
● भारतातील रहिवाशी नागरिकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
● प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही एक मदतीची विमा पॉलिसी आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत फक्त मृत्यू याच घटकाचा समावेश आहे.
● या योजनेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास किंवा एखादा अवयव रिकामी झाल्यास त्या व्यक्तीला अपंगत्व आल्यास या योजने अंतर्गत विमाधारकास कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही.
● जर एखाद्या व्यक्तीचे एकापेक्षा अधिक बँकेत बचत खाते असल्यास त्याला कुठलेही एका बँकेच्या सहाय्याने या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 आवश्यक कागदपत्रे (Document)

1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. मतदान कार्ड
3. पॅन कार्ड
4. बँकेचे पासबुक
5. मोबाईल नंबर
6. ईमेल आयडी
7. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
8. कुटुंबाचे रेशन कार्ड
9. जन्माचा दाखला

सरकारी योजनेसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 योजनेची वयोमर्यादा

● प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ हा फक्त 18 वर्षे ते 55 वर्षापर्यंत घेता येतो.

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 दावा करताना आवश्यक माहिती

1. अर्ज भरलेला पॉलिसी क्रमांक
2. बँकेचे संपूर्ण नाव व पत्ता
3. मृत्यू झालेल्या सदस्याचे नाव
4. मृत झालेल्या व्यक्तीचे बँक खाते
5. मृत झालेल्या व्यक्तीचा आधार क्रमांक
6. फॉर्म भरलेली तारीख
7. सदस्याचा मृत्यू झालेला मृत्यू दाखला
8. मृत्यूचे कारण
9. वारसदाराचे नाव
10. वारसदाराचे नातं
11. वारसदाराचा पत्ता
12. वारसदाराचा मोबाईल क्रमांक
13. वारसदाराचा आधार क्रमांक
14. वारसदाराचा बचत खात्याचा तपशील

अर्ज करण्याची प्रक्रिया

● सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तिथून योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
त्यानंतर पुढे तुम्हाला अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून व सोबत कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून सदर भरलेला अर्ज हा आपल्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जमा करायचा आहे.
● आपल्या अर्जाची तपासणी करून बँक किंवा पोस्ट खात्यातून 330 रुपये वजा केले जातील आणि आपण अशा प्रकारे योजनेचा लाभ घेऊ शकता.

शासनाचे अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा येथे क्लिक करा
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 अर्ज डाऊनलोड करा
सरकारी योजनेसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

सारांश

वरील दिलेले सर्व माहिती वाचून आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 साठी अर्ज करू शकता. फक्त 330/- रुपये वार्षिक वजा होऊन 2 लाखाचा आपल्याला विमा संरक्षण कवच भेटू शकते, माहिती आवडली असल्यास इतरांना देखील शेअर करा. काही अडचणी आल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा नक्कीच आम्ही उत्तर देऊ.

Leave a Comment