शेळी व मेंढी पालन योजना | शेळीपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान असा करा अर्ज
शेळी व मेंढी पालन योजना : महाराष्ट्र शासनाने राज्यातील बेरोजगार नागरिकांचा विचार करून त्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी; म्हणून शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शेळी मेंढी खरेदीसाठी महाराष्ट्र शासन कमीत कमी व्याजदराने 10 लाख ते 50 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देते. यामुळे राज्यातील बेरोजगार नागरिक स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी हा व्यवसाय करू शकतील. या योजनेमुळे राज्यातील बेरोजगार नागरिकांना लघु उद्योगाची तसेच मजुरीची ही संधी उपलब्ध होईल. जे नागरिक शेळी व मेंढी पालन योजना व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहेत त्या नागरिकांसाठी सुवर्णसंधी महाराष्ट्र शासनाने शेळी मेंढी पालन योजनेअंतर्गत देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने शेती करतात. अशा शेतकऱ्यांकरिता महाराष्ट्र शासन शेळीपालन योजने बरोबर विविध योजना राबवित असते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेळी मेंढी खरेदी करणे परवडत नाही; अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत शेळी मेंढी खरेदीसाठी अनुदान दिले जाईल. महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश नागरिक असे आहेत की शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहेत. परंतु त्यांच्याकडे शेळी मेंढी खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे नागरिक शेळी मेंढी पालन व्यवसायापासून वंचित राहतात. अशा नागरिकांना मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने शेळी मेंढी पालन योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण भागामध्ये आज देखील शेळीला गरीबाची गाय देखील म्हटले जाते. कारण अनेक कुटुंबामध्ये शेळी हे उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीच्या व्यवसायाबरोबर जोड व्यवसाय म्हणून परवडणारा व आर्थिक दृष्ट्या नफा देणारा हा शेळी पालनचा व्यवसाय आहे. राज्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढल्यामुळे आजही ग्रामीण भागातील अनेक तरुण शेळीपालन या व्यवसायाकडे वळाले आहेत. शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून शेळी पालन व्यवसायाकडे अनेक शेतकरी वळाले आहेत. बंदिस्त शेळीपालन करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नफा कमवता येतो व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बंदिस्त शेळी पालन याचे प्रशिक्षण देखील दिले जाते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेळ्या खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच काही प्रमाणात अनुदान देखील उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना शेळी व मेंढी पालन योजना व्यवसाय करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरत आहे.
वाचकांना विनंती
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेळीपालन या योजनेमध्ये वेळोवेळी बदल देखील केले जातात, तुम्ही ज्या वेळेस अर्ज करत असता त्यावेळी माहिती पडताळून पाहणे आवश्यक राहील. तसेच काही वेळा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या तारखा या वेळोवेळी जाहीर केल्या जातात ते देखील तपासणे महत्त्वपूर्ण राहील.
शेळी मेंढी पालन योजनेची थोडक्यात माहिती
राज्यामध्ये पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्यातील बेरोजगार नागरिकांना व्यवसायाची व रोजगाराची नवीन संधी उपलब्ध व्हावी; या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शेळी पालन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
योजनेचे नाव | शेळी मेंढी पालन योजना |
लाभ | दहा लाख ते पन्नास लाख रुपये |
उद्देश | पशुपालनासाठी प्रोत्साहन देणे |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी तसेच इतर इच्छुक नागरिक |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ ऑफलाइन |
शेळी व मेंढी पालन योजना मुख्य उद्दिष्टे
● राज्यातील शेतकरी तसेच इतर पशुपालन इच्छुक नागरिकांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे हा महाराष्ट्र शासनाचा मुख्य उद्देश आहे.
● राज्याच्या आर्थिक विकासाबरोबरच राज्यातील बेरोजगारी कमी करून व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे.
● राज्यातील शेतकऱ्यांना शेतीबरोबरच शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यास चालना देणे.
● राज्यामध्ये पशुपालन उद्योगाला चालना देऊन दूध आणि मांस यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे.
● राज्यातील शेतकरी तसेच इतर नागरिकांचे आर्थिक मनोबल वाढविणे.
शेळी व मेंढी पालन योजनाची मुख्य वैशिष्ट्ये
● राज्यामध्ये प्रथमता पशुसंवर्धन विभागाने शेळी मेंढी पालन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
● राज्यातील प्रत्येक प्रवर्गातील शेतकरी तसेच गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
● या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
● ज्या नागरिकाकडे व्यवसाय सुरू करण्यास पुरेशी जमीन उपलब्ध आहे अशा नागरिकाला या योजनेचा लाभ दिला जाईल.
शेळी व मेंढी पालन योजना चे लाभार्थी
● राज्यातील बेरोजगार नागरिक, पशुपालन इच्छुक, शेतकरी अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाईल.
शेळीपालन योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान
राज्यातील शेळी मेंढी पालन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 75 टक्के व खुल्या प्रवर्गातील प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान महाराष्ट्र शासन देते. अनुदानाचे संकल्पना पुढील तक्त्यामध्ये दर्शवली आहे.
100 मादी व 5 नर याकरिता अनुदान | 10 लाख रुपये |
200 मादी व 10 नर याकरिता अनुदान | 20 लाख रुपये |
500 मादी व 25 नर याकरिता अनुदान | 50 लाख रुपये |
शेळी व मेंढी पालन योजना योजनेचा फायदा
● राज्यातील शेतकरी तसेच इतर बेरोजगार नागरिकांना व्यवसायाची संधी उपलब्ध होईल.
● राज्यातील दूध, लोकर व मांस उत्पादनामध्ये जास्त प्रमाणात वाढ होईल.
● राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
● राज्यातील नागरिकांना व्यवसायासाठी व्याजदराने कर्ज काढण्याची आवश्यकता भासणार नाही.
शेळी व मेंढी पालन योजना योजनेसाठी आवश्यक पात्रता
● लाभार्थी व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
● लाभार्थी व्यक्तीचे कुटुंब दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे.
● लाभार्थी व्यक्तीकडे 1 ते 2 हेक्टर इतकी जमीन असणे आवश्यक आहे.
● लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे.
● लाभार्थी व्यक्ती ही कमीत-कमी 15 वर्षे महाराष्ट्राची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
शासनाच्या इतर योजना पहा
- ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी शासन देत आहे 40% अनुदान किंवा 35 लाख रुपये..पहा संपूर्ण माहिती
- महिला बचत गट कर्ज योजना महिला शासन देत आहे ५ ते १० लाख रुपये बिनव्याजी कर्ज असा करा अर्ज
शेळीपालन योजनेच्या अटी व शर्ती
● अर्जदार व्यक्तीचे किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे.
● अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
● अर्जदाराने या अगोदर कोणत्याही केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यापैकी कोणत्याही शेळी पालन योजनेचा लाभ घेतला नसावा.
● अर्जदार व्यक्तीकडे किमान 1 ते 2 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
● अर्जदार व्यक्ती ही पशुपालन व्यवसायासाठी इच्छुक असणे गरजेचे आहे.
● या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराला 2 रुपये अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
● अर्जदार व्यक्ती ही अनुसूचित जाती व जमातीतील असल्यास त्या अर्जासोबत जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
● अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्ड व बँक खाते यांना लिंक असावा.
● या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल.
● अर्जदाराला शेळी मेंढी पालन व्यवसायाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
शेळी व मेंढी पालन योजना योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक महत्वाची कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. रहिवाशी प्रमाणपत्र
4. मोबाईल नंबर
5. ईमेल आयडी
6. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
7. जातीचा दाखला
8. जमिनीचा 7/12
9. पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
10. बँक पासबुक
11. उत्पन्न प्रमाणपत्र
12. अर्जदार दिव्यांग असेल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र
13. हमीपत्र /बंधपत्र
14. इत्यादी
सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा
शेळी व मेंढी पालन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
शेळी व मेंढी पालन या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतात त्यासाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करा.
ऑनलाइन प्रक्रिया
● अर्जदार नागरिकांना सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
● वेबसाईटच्या होमपेज वर आल्यानंतर शेळी व मेंढी पालन योजना चा अर्ज असेल त्याच्यावरती क्लिक करावे लागेल.
● त्यानंतर तुमच्यापुढे योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे व आवश्यक असलेली कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील.
● सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तपासून ती सबमिट या बटनावरती क्लिक करावी लागेल.
● अशाप्रकारे तुम्ही शेळीपालन योजनेसाठी ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून घरी बसून अर्ज सादर करू शकतात.
ऑफलाइन प्रक्रिया
● अर्जदार शेतकऱ्यांना सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील चिडल्या कार्यालयातील पशुसंवर्धन विभागात जावे लागेल.
● सदरच्या विभागातून शेळी पालन योजनेचा अर्ज घ्यावा. वार जात विचारलेले सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून व आवश्यक ती कागदपत्रे त्यासोबत जोडावी लागतील त्यानंतर संपूर्ण भरलेला अर्ज व कागदपत्रे सदरचे कृषी विभागात कार्यालयात जमा करावी.
● अशाप्रकारे तुमचा शेळीपालन योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सबमिट होईल.
● अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होऊन तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल.
शासनाची अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप | जॉईन करा |
शेळीपालन योजनेसाठी हेल्पलाइन नंबर | १८०० २३३ ०४१८ / १९६२ |
सारांश :
अशाप्रकारे तुम्ही घरी बसून मोबाईलच्या माध्यमातून शेळी व मेंढी पालन योजना योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता. तुम्हाला अर्ज करत असताना कोणतेही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आम्ही त्याचे नक्की उत्तर देऊ. माहिती आवडली असल्यास इतर शेतकऱ्यांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करायला विसरू नका.